‘DEVELOPING A MORE SUSTAINABLE INDIAN TABLE GRAPE INDUSTRY’FINANCIAL LITERACY TRAINING 2

तुम्हा सर्वांना कळवण्यात आनंद होतो की,
IRFT ने नैताळे मधील महिलांसाठी Financial Literacy Training चे आयोजन २६-०९-२०१७ रोजी नैताळे या गावामध्ये केले होते. याच Training चा पुढचा भाग व्यवहार ज्ञान (Business Education ) काल ७-१२-२०१७ रोजी नैताळे मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी IRFT मधून पल्लवी आणि उद्धव हे उपस्तित होते. आणि महिलांना Training देण्यासाठी Swadhaar संस्थे मधून Trainer भक्ती यांना बोलावले होते. या Training साठी एकूण १७ महिला उपस्थित होत्या. या Training मध्ये व्यवहार कसा करायचा, एखाद्या वास्तूचे किंमत कशी ठरवायची, मार्केट कसे जाणून घ्यायचे, विक्रेत्यांसोबत कसा व्यवहार करायचा, आपल्या प्रॉडक्ट चे महत्व कसे पटवून दयाचे आणि बचत कशी करायची आणि त्याचे फायदे कसे होतात याचे मार्गदर्शन या Training मध्ये देण्यात आले. बचती साठी आम्ही "प्रेमळ बचत" ही संकल्पना सुरु केली, प्रत्येकांना या प्रेमळ बचत बॉक्स मध्ये दररोज कमीत कमी ५ रुपये टाकायचे आहेत आणि त्यांची बचत सुरु होईल.आणि आश्या प्रकारे बचतीची सवय त्यांच्या मुलांना पण लागेल.

काही उदाहरण देऊन महिलांना या सर्व व्यवहारांबद्दलचे मार्गदर्शन एकदम सोप्प्या पद्धतीने केले. उदाहरण ल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.आणि त्याचे उत्तर देणाऱ्यांना एक बक्षीस पण देण्यात आले. शेवटी Training संपल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र आणि बचत करण्यासाठी त्यांना एक बचत बॉक्स पण देण्यात आला.त्यानंतर सर्व महिलांसाठी फराळाची व्यवस्था पण केली होती. या Training चा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. आणि यापुढे ही अश्याच Training चे आयोजन IRFT इतर ग्रुप साठी पण करणार आहे.

धन्यवाद.